Share

Fact Check : विशेष रेल्वे गाड्या 31 मार्च 2021 पासून रद्द होणार असल्याचे वृत्त खरे आहे का ?

Published On: 

नवी दिल्ली-  कोरोनामुळे पुन्हा एकदा देशात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यातच रेल्वेसेवादेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्येही अशा प्रकारचा दावा केला असून या संबंधीचे अनेक मेसेजदेखील सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. मात्र, आता याप्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

समाजमाध्यमांवरील काही वृत्तांकनात सध्य़ा सुरू असलेल्या विशेष रेल्वे गाड्या रेल्वे 31 मार्च 2021 पासून रद्द करणार असल्याची देण्यात येत असलेली माहिती ही पूर्णपणे दिशाभूल करणारी व निराधार आहे, याची नोंद घ्यावी असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

समाजमाध्यमांवर चुकीच्या बातम्यांची चित्रणे फिरत आहेत. सगळ्यांना असे सूचित करण्यात येत आहे की फिरत असणारे हे चित्रण गेल्यावर्षीचे असून आजचे असल्याचे भासवण्यात येत आहे.भारतीय रेल्वेने अश्या प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

विशेष सेवा म्हणून सध्या सुरू असलेल्या प्रवासी व उपनगरी रेल्वे गाड्या सुरूच राहतील असे कळवण्यात येत आहे. प्रवाश्यांनी प्रवासात कोविड नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!