औरंगाबाद : रेल्वे पटरीवर थेट दुचाकी आणणे, बिनपरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणारे फेरीवाले, रेल्वेत सिगारेट, बिडी ओढणे, रेल्वे व रेल्वे स्थानकात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर आरपीएफच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात ६८ जणांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात येत आहे. चार दिवसात आरपीएफने ६८ जणांवर कारवाई केली आहे. त्यात मुकुंदवाडी भागात सर्वाधिक लोक रेल्वे पटरीवर वाहन चालवताना आढळून आले. रेल्वेच्या बाजूला असलेल्या कठड्यावर देखील काही लोक बिनधास्तपणे दुचाकी चालविताना आढळून आले. तसेच त्यात सायकलवाले देखील आढळून आले. असे एकूण ४० जणांवर कारवाई करून त्यांची वाहने देखील ताब्यात घेतली.
तसेच विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणारे सहा फेरीवाले आढळून आले. याशिवाय रेल्वे व रेल्वे स्थानकावर सिगारेट, किंवा बिडी ओढू नये अशा सूचना वारंवार देऊनही काहीजण याकडे दुर्लक्ष करत असल्याने एकूण १० जणांवर सिगारेट, बिडी ओढताना कारवाई करण्यात आली. त्यांना देखील आरपीएफने चांगलाच धडा शिकवला. याशिवाय धावत्या रेल्वे व रेल्वे स्थानकावर अस्वच्छता पसरवणाऱ्या बारा जणांवर कारवाई करण्यात आली.
चार दिवसांत ४२ हजार ४०० रूपये दंड वसूल
आरपीएफच्या वतीने चार दिवसात करण्यात आलेल्या कारवाईत ६८ जणांकडून दंडात्मक कारवाई करून ४२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय यापुढे देखील रेल्वे पटरीवर विनाकारण फिरणारे, रेल्वे स्थानकावर सिगारेट किंवा बिडी ओढताना आढळून आले किंवा रेल्वेत विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करताना आढळून आले तर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. त्यामुळे कुणीही रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करू नये. पटरीवर वाहने देखील चालवू नये. अन्यथा आणखी कडक कारवाई करू असेही आरपीएफने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- स्मार्ट फोन नव्हे, आता थेट शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी! औरंगाबाद मनपाचा अनोखा उपक्रम
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी आणि फडणवीसच असल्याचं सत्ताधारी का सांगत आहेत ?
- ‘भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’ ; कॉंग्रेसचा घणाघात
- जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार! औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये होणार वाढ
- ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येताना तरुणांनी आचरण उत्तम ठेवावे; राज्यपाल कोश्यारींचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
