Share

रोमांचक ! आता नजर शेवटच्या सत्राकडे; भारत विजयाच्या उंबरठ्यावर, जिंकण्यासाठी हवे फक्त…

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरु असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य मिळाले. खेळाच्या चौथ्या दिवशी, इंग्लंड संघाने त्यांच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या सर्वोत्तम सुरुवातीच्या आधारावर कोणतेही नुकसान न करता 77 धावा केल्या होत्या.

आजचा म्हणजेच पाचवा दिवस दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून क्रिकेट रसिकांचे लक्ष सुरु असलेल्या सामन्याकडे लागले आहे. आजच्या दिवसाचे पहिले दोन सत्र संपले असून आता निर्णायक तिसरे सत्र उरले आहे. आजचे दोन्ही सत्र हे भारतासाठी चांगले ठरले असून गोलंदाजांनी महत्वाची जबाबदारी बजावली आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राअखेर इंग्लंड ८ बाद १९३ धावांवर असून जवळपास फलंदाज हे बाद झाले आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त २ बळी हवे आहेत.

इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांची गरज असून ते आता सामना अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करतील. महत्वाचं म्हणजे भारतासमोर कडवं आव्हान उभं करणारा जो रूट हा बाद झाला आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत. तर, उमेश यादव याने १ बळी घेतला आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका विजयाच्या आणखी जवळ जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!