Share

खळबळ! बीडच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तलवारीने हल्ला

Published On: 

बीड : मंत्री संदिपान भुमरे यांची दोन दिवसांपूर्वी बीड येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांनी पक्षातील पदाधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर सोमवारी दुपारी घोडका राजुरीजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. तलवारीने हल्ला करून आपल्याला तलावात फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जगताप यांनी केला. या प्रकाराने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सोमवारी सकाळी हनुमंत जगताप हे सदाशिव सानप यांच्यासह दुचाकीवरून आपल्या भवानवाडी या गावावरून बीडकडे येत होते. घोडका राजुरी तलावाजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून पाच ते सहा दुचाकींवरून ८ ते १० तरुण आले. त्यांनी जगताप यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. जगताप यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांकडे तलवार होती. त्यांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र सानप यांनी तो रोखल्याने जीव वाचला. मात्र, आपल्याला बेदम मारहाण करून अंगावरील चेन, काही अंगठ्या हल्लेखोरांनी काढून घेतल्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची भेट घेतली. हल्लेखोर विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आले होते. हल्ला कुणी केला हे सांगता येणार नाही. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो होतो असे हनुमंत जगताप यांनी सांगितले. तर या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल. हा हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!