बीड : जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता बीड भाजपमधील माजी आमदार तथा पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बैठकीत उपस्थित होते. बीड जिल्हा बँकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. यावेळी आंधळे हे हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर हा पंकजा मुंडे यांना धक्का मानला जात आहे.
या बैठकीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत, आ.संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी आंधळे यांनी तिथे भाषणही केले. भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदरच बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे भाजपची सुरुवातीला पीछेहाट झाल्याचे दिसून आले. त्यातच आता भाजपचे माजी आमदार केशव आंधळे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
माजी आमदार केशव आंधळे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते. ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी आंधळेंना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. आंधळे यांनी ही भुमिका का घेतली हे अद्याप समोर आलेले नाहीये. पण पंकजा मुंडेंना हा एक मोठा धक्का आहे हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साखर कारखान्यांवरील महिला अत्याचाराला वाचा फोड’, सिंधूताईंचा आ.धसांना सल्ला
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
