🕒 1 min read
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे मिटलेला नसला तरीही दिवसेंदिवस बसच्या फेऱ्या आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने आज ४७ बसच्या १३९ फेऱ्यांद्वारे ३ हजार ४९४ प्रवाशांची ने-आण केली. तर अजिंठा लेणी पाहण्यासाठी विशेषतः ७ बस सोडण्यात आल्या. ७ बसच्या ६६ फेऱ्यांद्वारे ११९९ पर्यटकांनी आज अजिंठा लेणीला भेट दिली त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळात एकूणच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर ८ बसने सोळा फेऱ्या करण्यात आल्या. यात ६३० प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर ३ बसने १० फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ७ शिवशाही बसच्या ७ फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १४ शिवशाही बसच्या १४ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर २ बसने ८ फेऱ्या करण्यात आल्या.
गंगापूर-औरंगाबाद एका बसच्या २ फेऱ्या, गंगापूर-वैजापूर एका बसच्या २ फेऱ्या अशाप्रकारे एकुण ४७ बसने १३९ फेऱ्या केल्या असून ३४९४ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे. आज औरंगाबाद विभागात कोणत्याही कर्मचार्याचे निलंबण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे कोणतेही नवे कर्मचारी रुजू झालेले नाही.
नवे कर्मचारी रुजू झालेले नाही
शुक्रवारी साडेतीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी एसटीने प्रवास केला. मात्र अाज एकही नवीन कर्मचारी रुजू झालेला नाही. आत्तापर्यंत औरंगाबाद विभागात केवळ ६१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. गेल्या ८ दिवसात एकही नवीन कर्मचारी रुजू झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या याच कारणामुळे अजून पर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करावा; माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य
- सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा- देवेंद्र फडणवीस
- …हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

