Share

आरोग्य विभागाच्या परीक्षेसारखीच ‘या’ ही परीक्षेची गत

Published On: 

अहमदनगर: आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ सर्वांना माहीत आहेच. हॉल तिकीट वरील पत्ता चुकीचा त्याच सोबत पेपर देखील फुटल्याचे समोर आले होते, अशा प्रकारे आरोग्य विभागाच्या परीक्षा सर्वांच्याच लक्षात आहेत. आता आणखी एका परीक्षेची अशीच गत झाली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत जसा गोंधळ झाला होता तसाच याही परीक्षेत बघायला मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झाली आहे.

आज महाराष्ट्र राज्य पोलिस रिक्रूमेंट (Maharashtra Police)) मार्फत जेल पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात विविध ठिकाणी सेंटर दिले आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सुपे येथील एमईटी इंग्लिश मीडियम स्कूल हे या परीक्षेसाठी केंद्र नियुक्त केले आहे. मात्र परीक्षार्थी मुलांच्या हॉल तिकीटावर पारनेर माऊली इंग्लिश मीडियम स्कूल, असा पत्ता लिहिला आहे. विशेष म्हणजे अशा नावाची शाळाच तिथे नसल्याचे नंतर समजले.

परीक्षार्थी मुलांच्या हॉल तिकीटावर पारनेर माऊली इंग्लिश मीडियम स्कूल असा पत्ता लिहला असल्याने विद्यार्थी थेट पारनेरला (Parner) जाऊन पोहचले होते. त्यात भर म्हणजे एसटी बस बंद असल्याने आता तिथून पुन्हा सुपेला कसे जायचे अशा पेचात विद्यार्थी पडले होते. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या गोंधळामुळे अनेकांची परीक्षा देण्याची संधी हुकणार आहे यास जबाबदार कोण, असा सवाल परीक्षार्थी विचारू लागले आहेत. तसेच ही परीक्षा देण्याची पुन्हा संधी या मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!