Share

Exam Update: विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ चा शिक्का!

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: कोरोना महामारीचा कहर राज्यासह देशात सुरूच आहे. तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा आटोक्यात नसल्याने अनेक शहरांसह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. गेल्या ३ महिन्यात उद्योग-व्यवसायांसह शिक्षण क्षेत्रावर देखील मोठा परिणाम झाला आहे. साधारणतः सर्वच शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा या मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये असतात. मात्र, हेच महिने कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये गेले असून विद्यार्थ्यांना या सत्रात परीक्षा न घेता सरासरी गुणांवर उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

आता या बाबतीतील एक धक्कादायक बाब समोर येत आहे, राज्यात कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांनी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले आहे.

शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका वितरित केल्या जातील. दरम्यान, ‘कृषी पदवी विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हास आहे. यात अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एकाच रांगेत सगळे विद्यार्थी गणले जातील. बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे,’ अशी भावना अनिकेत पजाई या विद्यार्थ्याने लोकमतशी बोलताना दिली आहे.

पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून स्वतःला कलंकित करून घेऊ नका- सामना

दरम्यान, राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारी बंगल्यात आणखी काही दिवस राहू देण्यासंदर्भात प्रियंका गांधींनी केला ‘मोठा’ खुलासा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!