Share

परिक्षांच ठरलं? कुलगुरूंनी केली ‘या’ मुदतीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली.

या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, औरंगाबाद विद्यापीठ, SNDT, सोलापूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, गोंडवाना, कलसंचनालय, BATU, जळगाव विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी युजीसीकडून ३१ ऑक्टोंबर पर्यंत तर अमरावती व यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाने १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

सैन्य भारतमातेच्या सुरक्षेसाठी तय्यार, पण मोदींचे ‘लाल आँखे’ कधी दिसणार?

दरम्यान, मुदतवाढीचा प्रस्ताव युजीसीने मान्य करावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन युजीसीला मुदतवाढीची विनंती करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच, या परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना मुबलक वेळ देऊन जाहीर करण्यात येईल असे देखील सांगितले.

मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडलं पाणी, भंडाऱ्यासह ४0 गावांना पुराचा फटका

कधी होणार परीक्षा?

विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिना हा तयारीसाठी देण्यात येणार असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या परीक्षा घेण्यास सुरुवात होणार आहे.  यानंतर, काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबर तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबर पर्यंत निकाल जाहीर करतील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

…तर आशिष शेलार यांना असले ‘टुकार’ स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही – रुपाली चाकणकर

कशा होणार परीक्षा?

विद्यार्थ्यांना मानसिक वा शारीरिक त्रास न होता या परीक्षा घेण्यात येणार असून शक्यतो विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता या परीक्षा देता येतील अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या तयारी सुरु असून येत्या २ दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!