🕒 1 min read
नवी दिल्ली : गेले काही महिने भारत-चीन सीमावाद पेटला असून चीनची खोड अजूनही मोडली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. जून महिन्यात चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी चिनी सैन्याला रोखताना चिनी सैन्याने केलेल्या धारधार हत्यारांच्या हल्ल्यामुळे भारताचे २० जवान शाहिद झाले होते. यानंतर सीमाभागात प्रचंड अशांतता निर्माण झाली होती.
अजूनही चिन्यांचे शेपूट वाकडंच असून २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट झाली आहे. ईस्टर्न पॅंगॉग झील भागात दोन्ही देशाच्या सानिकांमध्ये ही झडप झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय सैन्य पुन्हा एकदा अलर्टवर असून चिनी सैन्याला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.
संजय राठोड यांचे शेतकर्यांच्या जीवनात ‘समृध्दी’ आणण्याचे प्रयत्न
यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून चीनच्या या कुरघोडी बंद करण्यासाठी कधी कडक पाऊल उचलणार असा प्रश्न करण्यात आला आहे. काँग्रेस नेता रणदीप सिंघ सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे, ” देशाच्या जमिनीवर घुसखोरीचे नवे दुस्साहस… रोज नवीन घुसखोरी, पॅंगॉग तलाव भाग, गोगरा आणि गलवान व्हॅली, डेपसंग प्लॅनस, लिंपूलेख, डोका लॉ व नाकु लॉ पास। सैन्य तर भारत मातेच्या रक्षणासाठी निडर उभे आहे पण मोदीजींचे ‘लाल आँखे’ (क्रोध) कधी दिसणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
देश की सरज़मीं पर क़ब्ज़े का नया दुस्साहस !
रोज़ नई चीनी घुसपैठ……..
पांगोंग सो लेक इलाक़ा,
गोगरा व गलवान वैली,
डेपसंग प्लैनस,
लिपुलेख,
डोका लॉ व नाकु लॉ पास।फ़ौज तो भारत माँ की रक्षा में निडर खड़ी हैं,
पर मोदी जी की “लाल आँख” कब दिखेंगी?#IndiaChinaBorderTension pic.twitter.com/oU2mPPAiHN
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 31, 2020
संतापजनक : चिन्यांचे शेपूट वाकडंच, भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झडप
दरम्यान, चीनच्या या घोसखोरीची संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ‘चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी देखील त्याला उत्तर दिलं. भारतीय सैन्य शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. चर्चेतून वाद संपवला जावू शकतो. पण तरी देखील आम्ही आमच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.’ असे चीनला ठणकावून सांगण्यात आले आहे.
‘गडचिरोलीचा विकास झाल्यास नक्षलवादाचा नायनाट होईल…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

