Share

मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडलं पाणी, भंडाऱ्यासह ४0 गावांना पुराचा फटका

Published On: 

🕒 1 min read

भंडारा : मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदीकाठावरील गावांसह भंडारा शहरातही पुराचे पाणी शिरले आहे. रात्री शहरातील काही पूरबाधितांना प्रशासनाने निवारा केंद्रात हलविले असून, खासदार सुनील मेंढे स्वतः स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागपूर नाका परिसरासह भंडाऱ्यातील टाकळी, जवाहरनगर, कपिलनगर भागात पुराचे पाणी शिरले असून, कारधा भागातील काही गावे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. या भागातील अनेक नागरिकांनी संपूर्ण रात्र घराच्या गच्चीवर काढली. पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली आहे. सध्या जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, भंडारा शहरासह ४0 गावांना पुराचा फटका बसला आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात मदत कार्याला वेग आलेला आहे.

तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात झालेला संततधार पाऊस आणि मध्यप्रदेशातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, या नद्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदीकाठावरील कार्धा, गणेशपूर, बेला, दावडीपर, पिंडकेपर, भोजापूर, भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, मेंढा, सिंधी कॉलनी, टाकळी, तुमसर तालुक्यातील रेंगेपार आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गावात पाणी शिरणार असल्याची कोणतीही कल्पना नागरिकांना नव्हती. शिवाय पाणी कमी होईल, अशी आशा त्यांची होती. परंतु मध्यरात्रीपासून पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. अखेरीस भोजापूर मेंढा, गणेशपूर, कारधा, या गावांतील नागरिकांना गच्चीवर रात्र काढावी लागली. गणेशपूर येथील नागरिकांना स्थानिक नागरिकांना डोंग्याच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

भंडारा येथील जलशुद्धीकरण केंद्र, ठोक भाजी बाजार पूर्णत: पाण्याखाली आले आहे. पुराचे पाणी भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात शिरले. या ठिकाणी पहिल्यांदाच चार फूट पाणी होते. भंडारा-तुमसर रोडवरील मेहंदी पुलावर चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ६ वर नागपूर नाक्याजवळील भोजापूर नाल्यावर जवळपास पाच फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात लांब रांगा लागल्या आहेत. मध्यप्रदेश व महाराष्ट्र हा आंतरराज्य मार्ग बंद आहे.

…तर आशिष शेलार यांना असले ‘टुकार’ स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही – रुपाली चाकणकर

भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, टाकळी भगतसिंग वार्ड, सिंधी कॉलनी, गुरुनानक कॉलनी, प्रगती कॉलनी, मेंढा परिसर महात्मा ज्योतिबा कॉलनी, गणेशपूर, भोजापूर परिसरमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. प्रगती कॉलनीमधील जवळपास पंधरा ते वीस घरे पाच ते सहा फूट पाण्याने वेढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर आर्शय घेतलेला आहे.

भंडारा शहराप्रमाणे, भंडारा ग्रामीण भागातील परिसरात हा पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. तुमसर तालुका आणि पवनी तालुक्यातील ही पुराचे पाणी बर्‍याच गावांमध्ये शिरलेले आहे त्यामुळे या सर्व भागात जनजीवन विस्कळीत झालेला आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा, सुकळ, गोंडीतोला, देवसारा, तामासावडी या गावात पुराचे पाणी शिरले आहे. पूर परिस्थिती लवकरच नियंत्रणात येणार असल्याचे सांगत या पुराचा फटका ४0 गावांना बसला असून सुरक्षा चमूकडून लोकांना हलविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कदम यांनी दिली.

काल रात्री बेघर झालेल्या सुमारे तीन हजार नागरिकांसाठी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. आजच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुनील मेंढे मदतकार्याची दिशा ठरवतील अशी माहिती मिळाली आहे. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित जागी हलविण्यास प्राथमिकता देण्यात येते आहे.

सैन्य भारतमातेच्या सुरक्षेसाठी तय्यार, पण मोदींचे ‘लाल आँखे’ कधी दिसणार?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!