टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाने थैमान घातले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाजनादेश’ यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. याच मुद्यावरून विरोधीपक्षातील नेत्यांकडून फडणवीस यांच्यावर निशाना साधण्यात येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी ट्विटकरत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुंबई, पुणे, कोकणसहित पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील जनता पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे, तिकडे जरा लक्ष द्या आणि मग महाजानदेशाचा राजकारण करा. असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
देवेंद्रजी मुंबई, पुणे, कोकणसहित पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील जनता पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे तिकडे जरा लक्ष द्या आणि मग महाजानदेशाचा राजकारण करा.
— Raju Shetti (@rajushetti) August 5, 2019
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपकडून राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे, तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना खुर्चीची काजळी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
जोतिष्यांना भविष्य समजत नाही परंतु चंद्रकांतदादांना अचूक भविष्य समजते
शिवसेनेची नाटकं संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत, आता शेतकरी फसणार नाहीत : राजू शेट्टी
दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी
ठरलं तर मग ! युतीत केवळ 103 जागांवर होणार 50-50 जागावाटप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

