जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पेटलेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंकडून सामोपचारानं हा वाद मिटवण्यात आला आणि चक्क या दोघांची गळाभेट देखील पहायला मिळाली.
शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर आज रविवार (ता. ३१ रोजी) पडदा पडला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे.
बोऱ्हाडे यांनी फेस बुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.
दरम्यान, अक्षय बोराडेने शिवप्रेमी आणि सोशल मीडियातील सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव सहानुभूतीसाठी वापरून फसवले.या प्रकरणातील अक्षय बोऱ्हाडे हा तरूण गुन्हेगारी टोळीशी परिचित असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे, हे ऐकलं होतं. पण त्याच्या कालच्या लाईव्ह वरून आता सिद्ध झालं, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
दरम्यान, जुन्नर पोलिसांनी त्याचे सहा महिन्यातील कॉल रेकॉर्डिंग तपासावे, तसेच त्याला मारहाण करण्यात आली अशा स्वरूपाचा व्हिडिओ, लाइव्ह आला त्यानंतरचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग तपासावेत. म्हणजे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजू शकेल, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
राज्यातील लघु उद्योगांना पॅकेज कधी घोषित करणार? उद्योगमंत्री म्हणतात…
भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याला झाला कोरोना, संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ
राज्याच्या 65 हजार उद्योगांना आतापर्यंत परवानगी, 9 लाख कामगार रुजू : देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

