Share

#corona : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झालेला परिणाम आणि करावयाच्या उपाययोजनांसाठी समिती गठीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोविड -१ ९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम आणि येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

लॉकडाऊन कालावधीत संपुर्ण देशात सामाजिक व आर्थिक जनजिवन विस्कळित झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कृषि शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे महत्वाचे योगदान आहे त्यांना अधिक बळकट करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर कोविड -१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचे दुरगामी परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने बाजार समित्यांवर झालेले परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास करून दोन महिन्यांच्या आत अहवाल शासनाला सादर करावा असे पाटील यांनी संगितले.

पणन संचालक सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे, हे सदस्य सचिव आहेत तर ए.के. चव्हाण, सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती मुंबई, बी.जे.देशमुख, प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे, कृषि उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती ललित शहा, कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीर कोठारी, कृषि उत्पन्न बाजार समिती जळगावचे सभापती कैलास चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सचिव अरविंद जगताप, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे या समितीचे सदस्य आहेत असेही पाटील यांनी संगितले.

कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

बहुतांश दवाखाने बंद, शाळेला बनवलं कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र

जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा; विखे पाटलांचा कॉंग्रेसला सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!