🕒 1 min read
मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज एक नवा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यात त्यांनी मुश्रीफ यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे.
तसेच आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत सर्व पुरावे ईडीकडे देऊन तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडहिंग्लज साखर कारखाना कसा काबीज केला, मुश्रीफ यांनी बेनामी कंपनीला कसा दिला याची पोलखोल करत ईडीशी चर्चा करून सर्व पुरावेही उद्या सादर करणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तसेच पारनेर कारखान्यात पवार यांचे जवळचे मित्र अतुल चोरडिया यांनी २३ कोटी दिले. कोणी गडहिंग्लजला पैसे देतं, कोणी पारनेरला. सगळे उद्योगपती पवार कुटुंबियांचे मित्र आहेत का? याबाबत ईडीसोबत चर्चा करणार. जरंडेश्वर नंतर पारनेरच्या घोटाळ्याचेही पुरावे देणार आहे असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
सोमय्या यांचा आरोप काय?
आज पत्रकार परिषद घेऊन सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. २०२०मध्ये मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारचे पारदर्शक निविदा प्रक्रिया न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे देण्यात आला. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. परंतु ब्रिक्स इंडियाला का कारखाना दिला हे शरद पवारांना जास्त माहित आहे. कारण की, मतीन हसीन मंगोली म्हणजे हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत. या ब्रिक्स इंडियामध्ये ७ हजार १८५ शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत. तर ९९८ मतीन हसीनचे आहेत आणि ९९८ गुलाम हुसेन यांचे आहेत, असा दावा सोमय्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
