Share

‘दक्षिण आफ्रिकेतून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईत आल्यावर केले जाणार क्वारंटाईन’

Published On: 

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे दिसत असतांनाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला असून राज्यात देखील हा नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी मोठी घोषणा केली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’दक्षिण आफ्रिकेतून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईत आल्यावर क्वारंटाईन केले जाईल आणि त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.’

दरम्यान, या व्हेरिएंटसंदर्भात पुण्यात पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की,’आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. द्या पंतप्रधान देशाती मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!