नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची काही वेळापूर्वीच प्राणज्योत मालवली. देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील वर्षी त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ पर्यंत काम पहिले. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी काम केले आहे. राष्ट्रपती पदापुर्वी त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले : प्रकाश आंबेडकर
त्यांच्या प्रकृतीवर सतत एक तज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठी गाठ आहे, ज्यासाठी त्यांनी आपत्कालीन व्हेंटिलेटर सहाय्याने शस्त्रक्रिया केली. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीरचं होती.
पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक – आबा बागुल


