🕒 1 min read
उस्मानाबाद : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आस्मानी संकटानं सारं काही हिरावून नेले. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.
शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला. यानंतर आता राज्यसभेचे भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाहणीकरिता येत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी एक ट्विट करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता रस्त्यावरूनही समजत असल्याचे सांगितले आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.आज उस्मानाबादमधून पाहणी दौऱ्यास जात असताना सुध्दा प्रचंड पाऊस सुरू आहे.सलग दुसऱ्या वर्षी हाताशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल आहे.रस्त्यावरून जात असतानाही शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानाची दाहकता जाणवत आहे. pic.twitter.com/x5jtQgZKt4
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 6, 2021
‘मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. आज उस्मानाबादमधून पाहणी दौऱ्यास जात असताना सुद्धा प्रचंड पाऊस सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी हाताशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतले आहे. रस्त्यावरून जात असतानाही शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानाची दाहकता जाणवत आहे’ या शब्दांत संभाजीराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
दरम्यान, मराठवाड्यात मागील चार महिन्यांत सर्वाधिक पावसामुळे किमान ९१ जणांचा मृत्यू झाला तर २५ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात मान्सूनच्या काळात होणाऱ्या एकूण ६७९.५ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत यंदा १०४१ मिलीमीटर पाऊस झाला.
तर पावसामुळे खरिप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु असली तरी शासनाच्या एका निर्णयामुळे नुकसानीच्या दाव्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. ज्या भागातील सर्व्हेक्षण यापूर्वी झालेले आहे अशा भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे पंचनाम्यानंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील जि.प. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दबदबा, पाहा कोणाच्या पारड्यात किती जागा
- ‘उद्यापासून ‘घट’ बसतील, पण मुख्यमंत्री कधी उठतील?’, शालिनी ठाकरेंचे टीकास्त्र
- कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; आर्यन खान प्रकरणी नवाब मलिकांची प्रतिक्रिया
- पीक विमा न भरलेल्यांनाही सरसकट मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील’, मंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही
- चुल्हीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतो; बच्चू कडू-अमोल मिटकरींमध्ये तुफान खडाजंगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

