Share

तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असत-संजय राऊत

Published On: 

शिरूर : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधत येणाऱ्या निवडणुकीत शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी शिवसैनिकांनी कार्याला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यावरून त्यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना सेनेचे तगडे आव्हानच त्यांनी दिले असल्याचेही बोलले जात आहे.

परंतु या दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत बोलताना म्हणाले कि, ‘राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे.’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय धुमश्चक्री माज्ण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधान सभा निवडणुकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला होता. यावरूनच संजय राऊत यांनी आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. त्यामुळे पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द फिरवणे हे तुम्हाला जमते आम्हाला नाही. असा पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!