मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, भाजपच्या सर्वच नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या कारवाईचे आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटत आहेत. तर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारच्या कारवाईची तक्रार केली आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देत सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईवर राज्यपाल देखील काही करू शकत नाही असे म्हंटले आहे. ‘काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाकडून झालेले गैरवर्तन संपूर्ण राज्याने पाहीले. या प्रकरणात निलंबित केलेल्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र विधानसभेत घडलेल्या गैप्रकाराला राज्यपालही मान्यता देणार नाहीत’, असे स्पष्ट मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनीही मुख्यमंत्री म्हणून केला होता. आम्हीही संपूर्ण विधानसभा मिळून तोच प्रयत्न करत आहोत. सद्यस्थितीत ५६ हजार ओबीसी उमेदवारांचे आरक्षण धोक्यात आले आहे. कोरोना परिस्थिती नसती तर आज वेगळी गोष्ट पहायला मिळाली असती. मात्र केंद्राचीच जनगणना सुरु नाही तिथे आम्ही कसा काय डाटा गोळा करू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा! राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरणार
- ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’; नाना पटोलेंसमोरच भाजप आमदारांची घोषणाबाजी
- शगुफ्ता अली गंभीर आजाराशी देतेय झुंज; मागितली आर्थिक मदत
- मोठी बातमी! इंग्लंडच्या तीन क्रिकेटपटुंना कोरोनाची लागण
- ‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’


