Share

‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’; नाना पटोलेंसमोरच भाजप आमदारांची घोषणाबाजी

Published On: 

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम असून भाजपने सभागृहाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. भाजप आमदारांच्या गैरहजेरीतच सभागृहाचं कामकाज सुरु असून विविध प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे. दरम्यान, सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सभागृहाबाहेर आले होते.

यावेळी भाजप आमदार आणि पटोले हे आमने सामने आल्याचं दिसलं. पटोले प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पटोले यांनी प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रिया दिली हे देखील स्पष्टपणे समजू शकलं नाही. नाना पटोले यांच्यासमोर ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है,’ अशी घोषणाबाजी भाजप आमदारांनी केली. मात्र, नाना पटोले हे त्यांना प्रत्युत्तर न देता निघून गेले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!