Share

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही…”; रुपाली पाटलांचा राणेंना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना ‘अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर’, अशी टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी आपल्या आक्रमक शैलीत निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. ‘वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही’, असा खोचक टोला रुपाली ठोंबरे पाटील यांनी निलेश राणेंना लगावला आहे.

याबाबत रुपाली ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘चा ‘राणे’ ने आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवारांच्या नाकापर्यंत राजकीय उंची भरणार नाही. पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

निलेश राणे अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते, ‘राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याचं नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाझळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर.’ असा खोचक टोला निलेश राणे यांनी अजित पवारांना लगावला होता.

त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. आता यावर राणे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!