मुंबई : ‘ईडी’सारख्या संस्थांनी स्वतःचे सत्त्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी महाराष्ट्राचे सरकार टिपून राहील, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून त्यांनी हे भाष्य केलं आहे.
राऊत म्हणाले, “भाजपाचे स्वतःचे व इतर मिळून ११२ आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने महाविकास आघाडीचं सरकार हे अनैसर्गिक सरकार आहे. हे सरकार लवकरचं पडेल असं भाकीतही त्यांनी केलं आहे.
पण त्यासाठी गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर आवश्यक आहे, हे त्यांना माहिती आहे. पण ईडी सारख्या संस्थांनी स्वतःचं सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहिल असं मी जबाबदारीनं सांगतो.”
कोणतंही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं जोपर्यंत ते टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचंच असतं. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीतच आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील ३७ भिन्न विचारांच्या पक्षांचं एनडीए सरकार पाच वर्षे चालवलं होतं. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटलं नाही. महाराष्ट्रावर कोविड, पूर, निसर्ग वादळ आणि लॉकडाउनसारखी संकटे आली नसती तर वर्षभरात राज्याचं चित्र बदलताना दिसलं असतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘रावसाहेब दानवे शुद्ध तुपातले आहेत का?’; ईडी चौकशीवरून बच्चू कडूंचा सवाल
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- ‘पुणेकरांनी बनवलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये’ : सुप्रिया सुळे
- धक्कादायक : सद्यस्थितीत भारतातील 70% कोरोनाचे सक्रीय रुग्ण ‘या’ राज्यांमधून
- ‘हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार’ : योगी आदित्यनाथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
