Share

शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य

Published On: 

औरंगाबाद: जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यातर्फे जिल्ह्यातील १ ते ९ आणि ११ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती व ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. परंतु ऑनलाइन कामकाज सुरू राहील.

१० वी व १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा व ८ वीसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ठरलेल्या नियोजनानुसार घ्यावी. ५० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाइन अध्यापन करावे. शिक्षकांनी स्टाफ रूम किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व जि.प.प्रशाला व प्राथमिक शाळांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यामुळे शाळांना जरी सुट्टी देण्यात आली असली तरी, शिक्षकांना मात्र नियमित शाळेत जावे लागणार आहे, यामुळे मोठ्या प्रमाणत कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो असा प्रश्नही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आवश्यक खबरदारीसह दर १० दिवसांनी कोरोना चाचणी देखील बंधनकारक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!