टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाआघाडीसंदर्भात सध्या बोलणी सुरू आहेत. आमची सकारात्मक भूमिका असून कशाप्रकारे मंत्रिमंडळ आणि जागावाटप होईल, याबाबत बैठकांतून चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोणाचे सरकार यावे, त्याचे स्वरूप कसे असावे, याविषयी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबई-दिल्लीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या प्रक्रियेत अशोक चव्हाण सहभागी आहेत. कोणताही राजकीय कार्यक्रम न घेता पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालक दिनाचे औचित्य साधत ते सिडकोतील इंदिरा गांधी शाळेमधील कार्यक्रमासाठी गेले.
कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी किंवा इतर राजकीय व्यक्तींना जास्तीचा वेळ न देता, व्यासपीठावर न जाता ते बालगोपालांमध्ये सामील झाले. अनेक मुलांना गुलाबपुष्प देऊन त्यांना बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. छोट्या-छोट्या मुलांसोबतची त्यांची छबी कॅमेऱ्यामध्ये अनेकांनी टिपली. त्यानंतर व्यासपीठावर येऊन सत्काराचा छोटेखानी सोहळा झाला. हातात माईक घेऊन त्यांनी थेट बालगोपालांशी संवाद साधला.
बालक दिनानिमित्त बालकांसोबत मी काहीवेळ घालावा, अशी माझ्या कन्या सुजया व श्रीजया यांची इच्छा होती. बालकांत रमण्यात मलाही नेहमी आनंद मिळतो, त्यामुळे राजकीय धामधुमीतही बालगोपालांशी हितगुज करण्यासाठी शाळेत पोचलो. मुलांमध्ये जाऊन आनंद घ्यावा व मुलांना आनंद द्यावा, यासाठीच आलो,’ असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाआघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली व लवकरच सरकार स्थापन होईल, असे स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1195270377615704070?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195270377615704070?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

