Share

शुल्कवाढ करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई होणारच : बच्चू कडू

Published On: 

मुंबई : खाजगी शाळा आणि प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या फी दरवाढीचा मुद्दा तसे पाहिला गेले तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. सत्ता बदलानंतर हा मुद्दा आता पुन्हा एकदा रंगू लागला आहे, याचे कारण असे की,आज विधानपरिषेदेमध्ये फी दरवाढीसंदार्भातील प्रश्न विचारण्यात आला, यावर शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

बच्चू कडू यावेळी म्हणाले की, “ज्या शाळा कायद्याखाली आल्या नाहीत, त्या शाळांचा अहवाल तपासून, माहिती घेऊन कायद्याखाली आणल्या जातील, तसेच शाळांमधील शुल्कवाढीसंदर्भात ज्या शाळा, संस्था पालन करत नाहीत, त्यांवर नवीन 2019 च्या सुधारणा कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करू.विशेष म्हणजे अशी कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला, तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू” असा सज्जड दम बच्चू कडू आणि आज विधानपरीषेदेमध्ये अधिकाऱ्यांना भरला.

इंग्रजी माध्यमांच्या शाळा सातत्त्याने फी दरवाढ करून आपला मनमानी कारभार करत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे वेळोवेळी पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळाले आहे, यावेळी अशा संबधित शाळांवर देखील कारवाई करण्यात येईल असे बच्चू कडू यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!