Share

इंग्लंडच्या मॅटने केली वॉर्नच्या ‘त्या’ जादुई चेंडुची पुनरावृत्ती

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाने सलग तिसरा एकदिवसीय सामना गमावला आहे. पाकिस्तानने दिलेल्या ३३१ धावांचे लक्ष्य नवख्या इंग्लंडच्या संघाने ७ गडी गमावुन पार केले. जेम्स व्हिन्सला सामनावीर आणि साकिब महमुदला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू गोलंदाज मॅट पार्किसनने एक असा चेंडु टाकला जो बघताच अनेकांना दिग्गज ऑस्ट्रेलियन माजी फिरकीपटु शेन वॉर्नची आठवण झाली. पाकिस्तानचा संघ ११३ धावावर १ गडी बाद असा खेळत होता. २६वे षटक मॅट टाकत होता. या षटकातील पाचवा चेंडु ऑफ स्टंपच्या इतक्या बाहेर टाकला फलंदाजी करणाऱ्या इमामने एक पाय पुढे करत ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला.

यानंतर जे झाले ते बघुन सर्व जण थक्क झाले. ऑफ स्टंफच्या बाहेर टाकलेला तो चेंडु १२ अंशापेक्षा जास्त मध्ये वळाला आणि थेट मधली यष्टी भेदत बेल्स उडवल्या. या चेंडुला बघताच अनेक क्रिकेट रसिकांना ऑस्ट्रेलियन माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा १९९३ मधील जादुई चेंडुची आठवण झाली. त्यावेळी टाकलेल्या त्या चेंडुने लेग स्टंपवर पहिला टप्पा घेत ऑफ स्टंप भेदला होता. या चेंडुला शतकातील सर्वेत्तम चेंडु म्हणले जाते. मात्र मॅटने इमामविरुद्ध टाकलेला हा चेंडु एकदिवसीय सामन्यातील सर्वेत्तम चेंडु आहे असे मत मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!