Share

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखुन विजय

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाचे खराब प्रदर्शन सुरु आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला ८ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला होता. श्रीलंका संघाने दिलेले १३० धावांचे लक्ष इंग्लंडने २ गडी गमावत सहज पार केले.

नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित २० षटकात श्रीलंकेच्या संघाने ७ गडी गमावत अवघ्या १२९ धावांची मजल मारली. श्रीलंकेकडुन दाणुस शणाकाने सर्वधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि २ षटकार मारले. इंग्लंडकडुन सॅम करन आणि आदिल रषिद यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. श्रीलंका संघात केवळ तीन फलंदाज दुहेरी धावसंख्या ओलांडु शकले.

श्रीलंकेने दिलेल्या १३० धावांचे लक्ष्य केवळ १८व्या षटकात २ गडी गमावत सहज पार केले. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय(३६) आणि जोस बटलर (६८*) यांनी ८० धावांची सलामी देत श्रीलंकेच्या आव्हानातली हवाच काढुन घेतली. इंग्लंडकडुन सलामीवीर जोस बटलरने ५५ चेंडुत आठ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ६८ धावांची खेळी साकारली. या विजयासह इंग्लंडने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!