Share

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या संघाची घोषणा! बेन स्टोक्स कर्णधार

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी इंग्लंड आणि श्रीलंका संघादरम्यान टी-२० मालिकेतील सामनाधीकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आज ६ जुलै रोजी समोर आलेल्या माहीतीनुसार इंग्लंड क्रिकेट संघाचे तीन खेळाडू आणि टिम मॅनेजमेंटच्या चार आशा एकुण सात सदस्यांना कोरनाची लागण झाली आहे.

यादरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी पाकिस्तान विरुद्धची मालिका ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार असे जाहीर केलेले होते. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. काही वेळापुर्वीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात श्रीलंकेविरुद्ध खेळलेला एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आला नाही. कारण त्या मालिकेतील सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेद्वारे बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तसेच पहिल्यांदा त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. स्थानीक क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना पाकिस्तान विरुद्ध संधी देण्यात आली आहे. यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ऍश्ले जाईल्स यांनी या कठीण काळात सहकार्य केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहे.ॉ

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!