Share

मालिका रद्द झाल्यावर भडकले इंग्लंडचे खेळाडू, असा व्यक्त केला राग…

Published On: 

मुंबई : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना रद्द केला असल्याची माहिती मिळाली.

मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला असल्याचे समजले.

शेवटची कसोटी इंग्लंडच्या खेळाडूंसाठी फार महत्वाची होती. कारण ही कसोटी जिंकून त्यांना मालिकेत २-२ अशी बरोबरी करता आली असती. पण हा सामना रद्द झाल्यावर इंग्लंडचे खेळाडू चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. आता या गोष्टीचा बदला घेण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी मोठे पाऊल उचलले आहे.

इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स यांनी आता आयपीएलमधून माघार घेतली आहे. हे तिन्ही खेळाडू संघांसाठी महत्वाचे आहेत. पण पाचवा कसोटी सामना रद्द झाला आणि त्यांची मालिकेत बरोबरी करण्याची गेल्यानं खेळाडूंनी असा राग काढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!