नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यानंतर आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू दुबईला रवाना होत आहेत. दुबईला रवाना झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूला थेट बायो बबलमध्ये प्रवेश करायचा होता, परंतु आता त्यांना 6 दिवसांच्या क्वारंटाईनमधून जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडूंना लवकरात लवकर दुबईला आणायचे आहे.
बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेटने परस्पर संमतीने 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणारा मँचेस्टर कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा सामना रद्द झाल्यानंतर आता आयपीएलचे फ्रँचायझी संघ आपल्या खेळाडूंना यूएईमध्ये आणत आहे.
आयपीएलचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीला पोहोचले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर पडिक्कलने आयपीएलचं 14 वं पर्व आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अद्याप आयपीएलचं जेतेपद पटकावलं नाही. आरसीबीचा संघ पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, आता हे पाहणे आवश्यक आहे की संघ दुसऱ्या टप्प्यात आपला तोच फॉर्म सुरु ठेवतो की नाही.आरसीबीने पहिल्या लीगमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले आणि दोन सामने गमावले. गुणतालिकेत आयसीबी तिसऱ्या स्थानावर आहे.
20 वर्षीय देवदत्तने यावर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी -20 पदार्पण केले. या हंगामात बंगळुरु जेतेपद जिंकणारच याबद्दल पडीकल आशावादी दिसला. एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘मला अशी आशा आहे. दरवर्षी प्रत्येकजण आयपीएल जिंकण्याच्या एकाच आशेने येतो. आशा आहे की यंदाचं वर्ष आमचं असेल. आमच्याकडे चांगली टीम आहे आणि काही चांगले पर्याय आहेत. आव्हानाला सामोरं जायचं आणि असलेली गती कायम ठेवायचा विचार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
- मुंबई इंडियन्सचे शिलेदार पोहोचले अबू धाबीमध्ये; सूर्या-रोहितने फोटो शेअर करत दिली माहिती
- पंजाब किंग्जसला धक्का; डेव्हिड मलानची आयपीएलमधून माघार, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- Ind vs Eng: 2022 मध्ये घेतला जाईल टी-२० मालिकेचा निर्णय
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार

