🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपानं आधीच निषेध नोंदवला आहे.
तसेच ‘तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?, तरुणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानं धाब्यावर बसवले जात आहेत का?, पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्राच्या गुंडगिरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?, अशा प्रश्नांची उत्तरं भाजपानं जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागितली आहेत.
गृहनिर्माणमंत्री @Awhadspeaks या प्रश्नांची उत्तरे द्यावीत – @Madhavbhandari_
महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरूणाला मारहाण केल्याचा आरोप आज केला गेला आहे. भारतीय जनता पक्ष या प्रकराचा जाहीर निषेध करतो. (१/६) pic.twitter.com/DR19BB5Xfs
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 7, 2020
याबाबत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन जितेंद्र आव्हाड डायलॉग मारायला खूप आवडतात. म्हणून या निमिताने सत्या चित्रपट ची एक लाईन..मौका सभी को मिलता है! अशा शब्दात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
