Share

ENG vs IND : मॅच सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं जो रूटला दिलं खास गिफ्ट; वाचा कारण!

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना (ENG vs IND) सुरु होत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आपला आघाडीचा कसोटी फलंदाज जो रूटचा विशेष भेट देऊन गौरव केला आहे. ईसीबीचे अध्यक्ष आणि मार्टिन बारलो यांनी रूट द सिल्व्हर बॅट दिली. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्याबद्दल रूटला हा सन्मान देण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटने दहा हजार धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा तो माजी कर्णधार अॅलिस्टर कुकनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. दोघांनी वयाच्या ३१ वर्षे १५७ दिवसात हा पराक्रम केला हा योगायोग म्हणावा लागेल.

रूटने त्या सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच चौथ्या डावात शतक झळकावले. त्याने ११५ धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. रूट हा भारताविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीचा भाग आहे, जो गेल्या दौऱ्यात पुढे ढकलण्यात आला होता. गेल्या वर्षी रूटने भारताविरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते पण यावेळी बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करत आहे.

जो रूटच्या आधी अन्य १३ कसोटी क्रिकेट फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू  सुनील गावसकर यांनी अशी कामगिरी पहिल्यांदा केली होती. त्यानंतर अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा, अॅलिस्टर कुक, युनूस खान आणि आता जो रूट या टप्प्यावर पोहोचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!