Share

“शेतकऱ्यांच्या पाणी मिळवून देण्यासाठी आमदारकीची सर्व ताकत पणाला लावू”

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – मणदुरे व केरा या विभागातील शेतकऱ्यांना निवकणे, चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मिळवून देण्यासाठी आमदारकीची सर्व ताकत पणाला लावू , असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.

यावेळी देसाई म्हणले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गेल्या चार वर्षात मोठया व मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली आहे. तारळी आणि मोरणा- गुरेघर या धरण प्रकल्पांच्या प्रमाणे मणदुरे व केरा या विभागातील शेतकऱ्यांना निवकणे, चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. माझी आमदारकीची सर्व ताकत या विषयासंदर्भात शासनाकडे मी लावणार असून पाणी मुद्यावर मणदुरे आणि केरा विभागातील जनतेने एक होण्याची गरज आहे.

साखरी ता.पाटण येथे मणदुरे आणि केरा विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पांची कामे पुर्णत्वाकडे नेवून या प्रकल्पातून ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधून या विभागातील शेतकर्यांना शेतीला पाणी मिळवून देणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परीषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मुक्ताबाई माळी, माजी सदस्य सुरेश जाधव, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, तानाजीराव घाडगे, मधूकर भिसे, बापूराव सावंत, विलास कुर्हाडे, बबनराव माळी, लक्ष्मण सकपाळ, कृष्णत देसाई, शंकरराव पाटील, बशीर खोंदू, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, अशोकराव पाटील, राजेंद्र पाटणकर, भरत साळुंखे व संजय जाधव आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!