Share

मराठवाड्यासह विदर्भात बँकिंग सेवेच्या विस्तारावर भर- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात बँकिंग सेवा आणि सेवेच्या विस्तारावर विशेष भर देणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र बँकिंग समितीच्या बैठकीत त्यांनी बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या संबंधीच्या सूचना केल्या. त्यामुळे दुष्काळी आणि मागास भाग असलेल्या ठिकाणी देखील बँकिंग सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

या बैठकीमध्ये डॉ. कराड यांनी मराठवाडा आणि विदर्भात बँकिंग सेवेला प्रोत्साहन देणे, सरकारी योजनांची व्याप्ती वाढवणे तसेच सूक्ष्म व लघू उद्योगांना क्रेडिट देण्याच्या संदर्भात आढावा घेतला. तसेच बँकांच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रेडिट वितरणाचे पुनरावलोकण करण्याच्या संदर्भात देखील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्योग क्षेत्राला या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

डॉ. भागवत कराड यांच्या रुपाने मराठवाड्याला प्रथमच केंद्रीत मोठे पद मिळाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांच्या आशा वाढल्या आहेत. मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील सर्व भागांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कराड यांनी सांगितले आहे. या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लावणार असल्याचेही कराड यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!