Share

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करताय दूर करा ‘हे’ गैरसमज !

Published On: 

नवी दिल्ली: आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत काही गैरसमज आहेत. जसे की, ही वाहन स्पीड कमी देतात. मात्र बाजारात काही इलेक्ट्रिक कार आहेत ज्या 160 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त स्पीड देतात. हुंडई कोना इलेक्ट्रिक कार कंपनी दावा करते की, कोनाचा स्पीड 167 KMPH आहे तर MG ZS EV देखील 140 KMPH प्रति तास स्पीड देते, Tata Nexon चा टॉप स्पीड देखील 120 KMPH आहे.

त्याचबरोबर इलेक्ट्रिक कार्सच्या बाबतीत हे देखील सांगितले जाते की, या कारला सारखे सारखे चार्ज करावे लागते. मात्र हे खरे नाही. कित्येक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज केल्या नंतर 400 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. तर इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाइक देखील सिंगल चार्ज मध्ये 70 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

या गड्या महाग असतात असा देखील लोकांचा समज आहे. मात्र इलेक्ट्रिक कार लॉन्ग टर्म चालतात उदाहरण म्हणजे महिंद्रा एंड महिंद्रा की eVerito ची किंमत 10 लाख रुपये पासून सुरु होते. जी एका सामान्य हैचबैक कार च्या तुलनेत थोडी महाग आहे. मात्र सरकार इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन म्हणून सबसिडी देखील देते. तर यासाठी लागणारा इंधन खर्च देखील कमी आहे. तर चार्जिंग ला देखील जास्त वेळ लागत असल्याचे देखील गैरसमज आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्या घरात जे 240V चे स्विच बोर्ड असते ते देखील रात्रभर या कारची चार्जिंग करू शकते. तसेच दिल्ली, मुंबई आणि बेंगलुरु या शहरात रस्त्यांवर चार्जिंग स्टेशन देखील लावले आहेत. ते केवळ अर्धा तासात इलेक्ट्रिक कार ला फुलचार्ज करतात. तर कागी शहरात Battery Swapping सेंटर देखील लावाण्यात आले आहे. इंडियन ऑयल ने देखील एक सेंटर चंडीगढ़ मध्ये उघडले आहे.

या इलेक्ट्रिक कार्स ला वेळोवेळी बदलावे लागते असा देखील समज आहे. मात्र अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार्सची आठ वर्षांपर्यंत वारंटी देतात्त. तर काही साधारण वाहने 5 वर्षांपर्यंत वारंटी देतात्त त्यामुळे आजच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात इलेक्ट्रिक वाहन खरेदी फायद्याची ठरू शकते. तर भविष्यात हाच एक चांगला पर्याय असल्याच नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!