Share

राज ठाकरेंना भाजपविरुद्ध प्रचार पडला महागात ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना प्रचार करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांच्या खर्चाचा तपशील देण्याबाबत ही नोटीस आहे.

लोकसभा निवडणुकीतून माघार घेत भाजप सरकारविरोधात प्रचार करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. यादरम्यान त्यांनी अनेक सभा घेतल्या. या सभांदरम्यान त्यांनी मोदी सरकारचा खोटारडेपणा व्हिडीओच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला होता. या सभांसाठी झालेल्या खर्चाचा तपशील आता राज ठाकरेंना द्यावा लागणार आहे. या संबंधाची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या भाजपविरुद्ध प्रचारामुळे भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!