टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहेत. त्या २१ ऑक्टोबर ला तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व म्हणजे २८८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यांची अर्ज भरण्याची तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर तर मतदान 21 ऑक्टोबर निवडणूक निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
आजपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख मतदार आहेत. तसेच य निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

