Share

पुणेकरांसाठी मतदान केंद्रे गुगल टॅग करणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मतदारांच्या उदासीनतेमुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झाली. मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून मिळाली आहे.

मतदारांना मतदान केंद्रे कोठे आहेत, किती अंतरावर आहेत, हे समजण्यासाठी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. गुगलमॅपवर बँकांची एटीएम सेंटर, हॉटेल, रुग्णालये, शाळा आदी ठिकाणांची माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे आता मतदान केंद्रांचीही माहिती गुगलमॅपमध्ये मिळणार आहे. त्यासाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे गुगल टॅग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यात ५० टक्क्याहून कमी मतदानाची नोंद झाली होती. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्यानुसार गेल्या वेळी ज्या मतदान केंद्रानावर तीस टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले ती मतदान केंद्रे शोधण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांच्या परिसरात मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती करण्यासाठी आणि मतदानाला प्रोत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच बदलेल्या मतदान केंद्रांची माहिती मतदारांना समजण्यासाठी आणि पुण्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासासाठी व्होटर स्लीप या घरोघरी पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या सर्व सुविधा मतदारांना मिळणार असल्याने मतदारांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेने केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181557356955459585?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!