🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे समजते. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आता शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाबाबद मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन गुजरात गाठले असल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ का आली याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेतेही आहेत, मात्र शिवसेनेने याबाबद आता मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण इतके वेगाने बदलले की महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे 13 हून अधिक आमदारांसह सुरतला पोहोचल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तातडीची बैठक बोलावावी लागली. या गदारोळात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
