मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून, त्यांच्यावर अनेक विरोधक नेत्यांनी निशाणा साधला होता. अशातच एकनाथ शिंदे यांनी त्या सगळ्या विरोधकांना एक सडकून प्रत्युत्तर दिले असल्याचं समजतं आहे.
राज्यातील नवे सरकार काही लोकांना हजम होत नाही-
राज्यात नवे सरकार आलेय, ही गोष्ट काही लोकांना हजम होत नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. काल स्व.आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी होती त्यानिमित्त शक्तिस्थळावर येऊन शिंदे यांनी दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर दिघे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले आमचा अजेंडा शून्य आहे-
आमचा काहीच अजेंडा नाही, आमचा अजेंडा शून्य आहे. फक्त जनतेची सेवा, जनतेला न्याय आणि राज्याच्या सर्वागिण विकास हाच आमचा अजेंडा असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील, याबाबत ते शंका-कुशंका व्यक्त करतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. तसेच दोन महिन्यांमध्ये राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिघेंनी हिंदुत्व तळागळात पोहोचवले-
आनंद दिघे हे आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत, त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. बाळासाहेबांना जे हिंदुत्व अभिप्रेत होते, ते हिंदुत्व त्यांनी तळागळात पोहोचवले आणि त्याची पोचपावती जनतेने त्यांना दिली असल्याचंही शिंदे यांनी सांगितल.
महत्वाच्या बातम्या :
- राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत; राज्यपाल कोश्यारी यांचे जॅकी श्रॉफ यांना आवाहन
- Nilesh Rane | शाहरुख खान एवढी क्रेझ शहाजीबापू पाटलांची महाराष्ट्रात झाली – निलेश राणे
- MNS । ‘सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली’, मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Shahajibapu Patil | “मानसी ताई म्हणतात पाटील जोमात” ; शहाजीबापूंची पुन्हा एकदा तुफान डायलॉग बाजी
- Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर घरी बसले नसते; नवनीत राणांची जहरी टीका


