Share

Eknath Shinde | “आम्हाला कोणी…”, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आक्रमक

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलेल्या ४० आमदारांसोबत गुवाहाटी (Guwahati) येथील कमाख्या देवीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईसाठी रवाना होणार असून त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं.

यावेळी, आम्ही श्रद्धेने कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. एक वेगळा आनंद, समाधान सर्व आमदारांना मिळालं आहे. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केल्याचं तुम्ही इथे पाहिलं का? सर्वजण मोकळेपणाने फिरत होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघेंनाही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुत्वाला पुढे नेणारी, आनंद दिघेंचं विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेचं राज्य असून त्याचा विकास करण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

यादरम्यान, उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० लोक असून बहुमत आहे. आमच्या गटाकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. जी प्रक्रिया असेल त्यात आम्ही जिंकू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असतं. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!