🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरात पेटला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना, महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाली असेल तर ही निषेधार्ह बाब आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. सीमावाद सुप्रीम कोर्टात असून, प्रत्येक राज्याने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. असं असताना महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये अशी माझी विनंती आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आपण एका देशात राहत असून, सीमावाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका घेतली पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जे उकसवायचं काम सुरु आहे ते बंद केलं पाहिजे. तसंच संबंधितांवर कडक कारवाई करावी. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राला आक्रमकता काय असते हे चांगलंच माहिती आहे. आक्रमकता काय असते याचे धडे दुसऱ्या राज्यातून घेण्याची गरज नाही. पण एकाच देशात राहत असल्याने सरकार आणि जनता संयम पाळत आहे. यामुळेच कर्नाटक सरकारने हस्तक्षेप करत अशा प्रवृत्तींना रोखलं पाहिजे यासाठी विनंती केली आहे, असं पण ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार”, अजित पवार स्पष्ट बोलले
- Akshay Kumar | अक्षय कुमार आगामी चित्रपटातून देणार लैंगिक शिक्षणाने धडे
- Shambhuraj Desai | “वास्तविक आम्हाला कर्नाटकला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, मात्र…” ; शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण
- Raj Thackeray | “बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे हे पदरही उलगडायला हवेत”; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचं अभिवादन
- Health Care | दिवसभर कोमट पाणी पिल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
