Share

Ajit Pawar | “केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता, मास्टरमाईंड कोण?” ; कर्नाटकप्रश्नी अजित पवारांचा सवाल

Published On: 

Ajit Pawar | मुंबई : शिंदे फडणवीस सरकारने कर्नाटक दौरा रद्द करण्यामागे महापरिनिर्वाण दिन असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारच्या अशा सारवासारवं भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान पिळले. महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी असतो याची माहिती संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे दौऱ्याची तारीख ठरवताना सर्व गोष्टीची कल्पना घ्यायला हवी होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकात येऊ देणार नाही, असे स्पष्ट सांगतात हे राज्य सरकारचे अपयश आहे ते झाकण्यासाठी काही थातूर-मातूर उत्तरं देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

तसेच पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ज्याप्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यावरून कर्नाटक सरकारच्या ‘आरे’ला महाराष्ट्र सरकारने ‘कारे’ने उत्तर द्यायला पाहिजे. यासाठी तक्रार करण्याऐवजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करून महाराष्ट्राची ताठर भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीचा विषय बनला आहे. याचे खापरं सत्ताधारी महाविकास आघाडीवर फोडत आहेत. या भूमिकेवरून अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी समजून आत्मचिंतन करण्याऐवजी सत्ताधारी आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता आहे त्यामुळे यामागील मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा शोध निश्चित घ्यावा, असे थेट आव्हान त्यांनी राज्य सरकारला केले.

तसेच कारवार, निपाणी, बेळगाव या भागासह महाराष्ट्राचा नकाशा व्हायला हवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र जत, देगलूर, अक्कलकोट, सुरगाणा या भागातील ग्रामस्थांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने त्या भागातील विकासकामांना दिलेली स्थगिती हे या ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचे कारण आहे. स्थगिती देण्याचे काम ज्यांनी केले त्यांनी ती स्थगिती उठवावी यातून ग्रामस्थांचे समाधान होईल व त्या भागातील कामे होतील, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!