Share

Eknath Shinde | “…म्हणून मी शिवसेना सोडली”; एकनाथ शिंदे यांनी केलं स्पष्ट

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचेनेते होते. परंतू त्यांनी अचानक भाजप पक्षासोबत युती करत शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातून का बाहेर पडले हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य –

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला नेहमीच विरोध केला. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी शिवसेनेच्या नेतृत्वाने युती केली होती. त्यामुळे या विचारांपासून आम्ही फारकत घेतली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे एका वृत्तवाहिनीला मुलाखल देत होते. त्यावेळी ते बोलत असल्याचं समजतं आहे.

भाजपसोबत आमची नैसर्गिक युती आहे.-

पुढे एकनाथ शिंदे असं म्हणाले की, भाजप आणि आमची नैसर्गिक युती आहे. भाजपबरोबर युती केल्यानं सामान्य नागरिक तसेच शिवसैनिक समाधानी आहेत. पक्ष वाढविणे हे नेतेमंडळींपासून सामान्य कार्यकर्त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष देत होते. 17 वर्षाचा असल्यापासून मी शिवसेनेत काम करत आहे. सगळं आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केलं असताना, अशा वेळी मी शिवसेना सोडण्याचा विचारही करू शकत नाही. तसे माझ्या मनातही कधी येणार नाही.

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही-

तसेच,शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!