🕒 1 min read
नवी दिल्ली: राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच जे. पी.नद्दांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असून आषाढी एकादशी झाली कि, आम्ही मुंबईत भेटून याबाबत चर्चा करून आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लोकांच्या मनात असलेलं सरकार आम्ही स्थापन केले आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सरकार स्थापन करण्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सदिच्छा भेट घेतली असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील घडलेल्या घडामोडींची राज्याने तसेच देशाने नव्हे तर जगाने नोंद घेतली आहे. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी अजूनच वाढली असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : विराट कोहलीला दुसऱ्या टी-२० सामन्यात संघात स्थान नाही; भारताच्या माजी खेळाडूंचं वक्तव्य
- Akshay Kumar : अमरनाथ दुर्घटनेवर अक्षय कुमार भावूक, ट्वीट करत म्हणाला…
- Sanjay Raut | “शिंदेंची हायकमांड दिल्लीत, धनुष्यबाण हातात ठेवा, कुठे घुसवायचाय हे…” ; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी
- Anand Mahindra : “गरज ही शोधाची जननी असते…”, आनंद महिंद्राचे ‘ते’ ट्विट व्हायरल
- Jayant Patil : “आरक्षणाशिवाय निवडणुका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी…”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
