Share

Eknath Shinde | “संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी…”, शिंदे गटाचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केला. या बंडानंतर विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार घणाघात केला. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशणा साधला आहे.

यावेळी, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात.पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी खासदारकीचा राजीनामा द्या, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

तसेच, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. माझं पक्ष नेतृत्वाला विचार नाही आमचं काही योगदान नाही का? काही लोक लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करताहेत. गेली अडीच वर्षे सीमा भागासाठी तुम्ही काय केलं? त्यांना जमलं नाही ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, सीमाप्रश्नाच्या बाबतीत कर्नाटककडून चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. यावर कर्नाटक सरकारने विचार केला पाहिजे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे सीमावादाचा गोंधळ निर्माण झाला. सीमा भागात अन्याय होत असताना स्पष्ट दिसतंय.आमचाच भाग घ्यायचा आणि आमच्याच मंत्र्यांना येऊ नको म्हणायचं हे कितपत योग्य आहे? सीमा प्रश्नाच्या बैठकीत काही गोष्टी ठरत आहेत. हा विषय संपवा, कर्नाटक सरकारला विनंती आहे, असं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!