🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले तेव्हापासून शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट झालेले दिसून येत आहेत शिंदे गटातील नेते आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसेना पक्षातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांना गद्दार असं म्हटलं जातं तसेच 50 खोके ही घोषणा देखील राज्यभर प्रसिद्ध झाले आहे याच मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर-
खोके कुठे जातात आणि कोण कोठे गद्दारी करतो हे मला माहित आहे त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे उपस्थित असताना त्यावेळी ते बोलत होते
हे सगळं जरी असलं तरी मला काम करायचं आहे मला कामाने उत्तर द्यायचं आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही त्यांनीही मला बोलायला भाग पडू नये एवढीच माझी इच्छा असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वांच्या विचारांशी बेईमानी कोणी केली बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली तसेच आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली हे सगळं आम्ही बोलू शकतो सध्या तरी मी हे सज्जन भाषेत बोलत आहे पण यावर मी नक्की बोलणार आहे.
म्हणून देशात शिवसेना मोठी झाली-
पुढे ते असेही म्हणाले की, बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारण्याचं काम केलं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करता येणार नाही. त्यांना जवळ करण्याची जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान म्हणजेच शिवसेना पक्ष बंद करेन, अशी रोखठोक भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपण शिवसेना मोठी केली. आहोरात्र सर्वजण झिजले, म्हणून देशात शिवसेना मोठी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या:
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
