🕒 1 min read
गुवाहाटी : शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. यावर मराठी गाणे देखील आले आहे. लोक फोटो टाकताना शहाजीबापूंचे वाक्य कॅप्शन टाकत आहेत. अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली.
आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजीबापूंचे मनापासून कौतुक केले. यावेळी शिंदे यांनी बापूंना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं.
बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन
राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पोस्ट करत कळकळीची विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका.”
“शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू,” अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
