Share

एकनाथ खडसेंनी दिला आठ दिवसांचा वेळ ; अन्यथा बसणार उपोषणाला…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव येथील रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र तरीही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने आठ दिवसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी राज्य आरोग्य संचालकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, “डॉक्टर नसलेल्या रुग्णालयाबाहेर सूचना फलक लावण्यात यावा, जेणेकरुन रुग्णांचे हाल होणार नाहीत. आठ दिवसात जर डॉक्टर उपलब्ध झाले नाही तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करु.”

मी पाठपुरावा केल्याने आरोग्यमंत्र्यांकडे चार वेळा बैठक घेण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य संचालक आणि उपसंचालक यांना मी तीन वर्षात किमान 30 वेळा भेटलो, संपर्क केला. डीपीडीसीत प्रश्न मांडला, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. परंतु काहीही फायदा झाला नाही." अस एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!